अमरावती ई-पेपर

बेदरकारपणे ट्रक खांबावर आदळल्याने अर्धे शहर अंधारात

बेदरकारपणे ट्रक खांबावर आदळल्याने अर्धे शहर अंधारात रस्ते बांधकाम कंपनीने मात्र पुसले अपघाताचे डाग आशिष गवई ,परतवाडा १२/ परतवाड्यात काल दि. १‍१ ला रात्री ११च्या दरम्यान परतवाडा अंजनगाव अकोट हा राज्य महामार्ग विकसित करणाऱ्या कंन्ट्र्कशन कंपनीच्या ट्रकने अंजनगाव स्टॉप जवळील एका विद्युत खांबाला बेदरकारपणे ट्रक चालवून धडक दिल्याने वीज पुरवठा खंडित होऊन जवळपास अर्धे शहर रात्रभर अंधारात राहिल्याची संतापजनक घडली आहे.ट्रक क्र.जि. जे १८ ए. यू.९१०५ हा रात्रीच्या साडेदहा ते ११ दरम्यान परतवाडाच्या अंजनगाव चौकातील विद्युत वितरणच्या मुख्य खांबाला बेदरकारपणे जाऊन धडकला . धडक इतकी प्रचंड होती की या धडकेने अक्षरशा विद्युतवितरणचा खांब पूर्णतः कोलमडला तसेच ट्रकही अक्षरशहा पलटी झाला . ट्रकची खांबाला इतकी जोरदार धडक लागली की डीपीमधून मोठा आवाज होत परिसरातील जवळपास वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तर रात्रभर नागरिकांना अंधारात झोपावे लागले तर अनेकांना याचा मानसिक त्रासही झाला.या सर्व प्रकरणाला रात्र उलटून गेली असूनही अजूनपर्यंत संबंधित परीसरामध्ये वीजपुरवठा सुरळीत झालेला नसल्याने नागरिकांचा रोष कायम आहे . मात्र एवढे मोठे प्रकरण झालेले असताना सुद्धा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदाराने एका तासामध्ये मोठी क्रेन बोलावून अपघातग्रस्त ट्रकला ताबडतोप दुसरीकडे हलविले, तर घडलेल्या अपघाताचे संपूर्ण निशानही ठेकेदाराने अक्षरशा पुसून काढल्याची चिड आणनारी घटना घडली आहे . इतका मोठा अपघात झाल्यावरही पोलिस प्रशासनाला याची खबर किंवा भनकही कशि काय लागली नाही ? हाच एक प्रश्न उपस्थित होत आहे. जर ट्रक किमान अर्धा तास किंवा एक तास आधी खांबाला धडकला असता तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ असते नागरिकांची रेलचेल असते तर अपघात झाल्याने ट्रकखाली येऊन अनेकांचा बळी सुद्धा गेला असता. याची जाणीव संबंधित ठेकेदाराला आली की नाही किंवा पोलीस प्रशासनाने याची दखल का घेतली नाही ? हेही एक न उलगडनारे कोडेच ? अपघात झाल्यानंतर मात्र परतवाडा शहरातील बऱ्यापैकी नागरिकांना अंधारात झोपावे लागले हे मात्र सत्य आहे यावर आता पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .