अमरावती ई-पेपर

पुरातत्व विभाग फुबगावात घेतोय लोहयुगातील मानवी संस्कृती चा शोध; ३ हजार वर्षपूर्वीचे अवशेष मिळणार; ३ महिने चालणार शोध

पुरातत्व विभाग फुबगावात घेतोय लोहयुगातील मानवी संस्कृती चा शोध; ३ हजार वर्षपूर्वीचे अवशेष मिळणार; ३ महिने चालणार शोध

रिपोर्टर :- सुमित हरकूट

चांदूर बाजार ;- तालुक्यातील फुबगाव सौदापूर येथील पूर्णा नदीच्या काठावर 3 हजार वर्ष पूर्वीच्या लोहयुगातील मानवी संस्कृती चे अवशेष चा शोध घेणे सुरू आहे. या करिता भारतीय पुरातत्त्व विभाग गावात डेरेदाखल झाला आहे .
लोहयुगात नदीकाठी मानव संस्कृतीचा वसा होता. त्यात पूर्णा नदीच्या काठावरील जमीन काळी कसदार, सुपीक व नदीला भरपूर पाणी यामुळे या नदीच्या काठावर पुरातन काळापासून लोक वस्ती बसत होती. पूर्वी मानवाचे अधिककाळ वास्तव नदीकाठावर राहत होती. त्यामुळे मानवी संस्कृतिचा विकास नदीच्या काठावर वस्तीमध्ये झाला आहे. 3 हजार वर्षा पूर्वी पूर्णा नदीच्या काठावर मानव संस्कृती होती. या नदीच्या काठावरच गावाची समृद्धी गावाचा विकास झाला. लोह युगात देखील या भागात संस्कृती फुलत होती. त्या काळात आलेल्या महापुर, महामारी, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्ती मुळे अशा वस्त्या उजाड होत गेल्या. पण त्यांचे अवशेष आजही विदर्भाचा अनेक गावात आढळून येतात.
अशा मानवी संस्कृतीचा शोध घेण्यासाठी नागपूर येथील भारतीय पुरातत्त्व विभागाची टीम तालुक्यात दाखल झाली आहे. त्यांनी तालुक्यातील फुबगाव सैदापूर येथे दीपक किटुकले यांच्या शेतात उत्खनन सुरू केले आहे. या विभागाचे नागपूर येथील संचालक डॉ. निहील दास एन याच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे. या उत्खननाचे उद्घाटन प्रभारी तहसीलदार निलिमा मते यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी सरपंच संगीता कितुकले व मंडल अधिकारी श्री. दाते, राजाभाऊ ठाकरे,व गावकरी मंडळी उपस्थित होती.
या पूर्वी देखील सन 1982 -84 मध्ये या विभागा तर्फे डॉ. कोपर्डेकर यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील तुळजापूर गढ़ी येथे पुरातन विषयी उत्खनन करण्यात आले होते. त्यावेळी लोह युगातील संस्कृतीचे अवशेष सापडले होते. तसेच बहादुरपुर येथे सुद्धा लोहयुगाची अवशेष सापडले होते. तर मागील वर्षी देखील याच विभागातर्फे फुबगाव येथे सर्वेक्षण केले असता अवशेष आढळून आले होते. त्यामुळे आता फुबगाव येथे मानवी संस्कृती चा शोध 3 महीने चालणार आहे. यासाठी या विभागातील १५ लोकांची तज्ञ टीम या गावात तळ थोकुन आहे.
या टीमचा निवासस्थानासाठी भीमराव पडसपगार याचा शेतात तंबू उभारण्यात आले आहे. या टीममध्ये, डॉ प्रशांत सोनोने, डॉ पी पी प्रधान, डॉ. एच. जे बारापात्रे आदी असून यामध्ये स्थानिक मजुरांचा सुद्धा सहभाग घेतला जात आहे. या उत्खणामुळे लोहयुगातील मानवी संस्कृती जगासमोर येणार आहे. तसेच या भागातील एक नवीन पुरातन इतिहास समोर येणार आहे.

” गेल्या वर्षी चांदूर बाजार तालुक्यातील फुबगाव येथे लोहयुगातील मानवी संस्कृती चे अवशेष मिळण्याची शक्यता आहे. तसेच दर्यापुर तालुक्यात सुद्धा पुरातन मानव वस्ती असल्याचे काही अवशेष मिळाले असल्याचे पुरातत्व विभागाचे प्रशांत सोनोने यांनी सांगितले”