अमरावती ई-पेपर

स्थायी समितीच्या तीन सदस्यांची निवड विशेष समित्यांची निवडणूक १८ ला

स्थायी समितीच्या तीन सदस्यांची निवड
विशेष समित्यांची निवडणूक १८ ला

आशिष गवई ,

परतवाडा:- अचलपूर नगरपालिका येथे आज दि. १‍१ रोजी सकाळी ११ ला स्थायी समितीच्या तीन सदस्यांची नीवडनूक घेण्यात आली. यामधे ३ सदस्यांची बिनवीरोध निवड करण्यात आली . तर येत्या १८ जानेवारीला विशेष समित्यांचे सभापतीपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे .

अचलपूर नगर पालिकेमध्ये स्थायी समितीच्या सदस्यांसाठी नीवडणूक घेण्यात आली . न. पा. अचलपूर येथील तीन गटांनी आपापले प्रतिनिधींचे नामनिर्देश पिटासीन अधिकाऱयांसमोर जाहीर केले, तिनही सदस्यांना विरोध नसल्या कारणाने बिनविरोध सदस्यांची निवड करण्यात आली . यामध्ये सुरेश झींगूजि क्षिरसागर (शहर विकास आघाडी) संदीप फुलचंद ककरानिया (लोकभारती) मो. अबिद गुल हूसेन (राष्ट्रीय विकास आघाडी यांचा समावेश आहे .

येत्या १८ जानेवारीला विशेष समित्यांचे सभापती पदासाठी निवडणूक घेणार येणार असल्याचेही पीठासीन अधिकारी व्हि. राठोड तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांच्या समक्ष ठरवीण्यात आले.यामध्ये (१)सार्वजनिक बांधकाम समिती, (२)शिक्षण क्रीडा व
सांस्क्रूतीक कार्य समिती,(३) स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती,(४) पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती .(५)नियोजन व विकास समिती(६) महिला व बालकल्याण समिती अशा ६ विषेश समित्यांच्या सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे .स्थायी समितीचा अध्यक्ष स्वतः नगराध्यक्षच असल्याने त्यांना वगळून , आणखी सहा पदांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे .तर येणाऱ्या १८ जानेवारीला स्थायी समितीच्या विशेष समिती सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

प्रलोभने बैठका सुरू ~

सदर विशेष समित्यांच्या सभापति आपल्याच गटाचा सदस व्हावा यासाठी तिन्ही गटांकडून बैठका सुरू झाल्या आहेत. तर सदस्यांना विविध प्रलोभने देत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्नही होताना पहायला मिळत आहे . एकंदरीत सभापतीपदासाठी अचलपूर नगरपालिकेमध्ये रस्सीखेच सुरू झालेली असून वेळप्रसंगी वरिष्ठ पातळीवरूनही सभापतीला निवडून देण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे बोलल्या जात आहे