अमरावती ई-पेपर

पोलीस अधीक्षक आपल्या गावी या कार्यक्रमाचे मोर्शी येथील पंचायत समिती सभागृह मध्ये आयोजन

पोलीस अधीक्षक आपल्या गावी या कार्यक्रमाचे मोर्शी येथील पंचायत समिती सभागृह मध्ये आयोजन

मोर्शी – तालुक्यातील दखल अदाखाल एन सी. गुन्ह्यांची नोद पोलिसात केल्या जाते सर्व सामान्य जनतेला न्याय मिळत नाही याची दखल घेऊन अमरावती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप झळके यांनी ९ जानेवारी रोजी पंचायत समिती सावित्रीबाई फुले सभागृहात तक्रारीचे निवारण करण्यासाठी जनता दरबारचे आयोजन केले होते. दुपारी १२ वाजता कार्यक्रम सुरु झाला प्रत्येक तक्रार कर्त्याला सन्मानाने स्टेजवर बोलाविण्यात आले व अर्जदाराचे म्हणणे ऐकून त्यांच्या तक्रारीचा निपटारा करण्याचा आदेश संबधित ठाणेदाराला देण्यात आला. गेल्या पन्नास वर्षात पहिल्यांदा पोलिसाकडून इतक्या आदर्श सन्मानाची वागणूक मिळाली याचे आचार्य महिला पुरुषामध्ये व्यक्त होत होते. या प्रसंगी सर्व ठाणेदार पोलीस मोठ्या कुतूहलाने एस. पी. दिलीप झळके यांचा जनता दरबार बघत होते.

या मध्ये शिरखेड २००, मोर्शी २००, वरुड १५०, शेदुर्जना घाट २००, बेनोडा २१०, अश्या अदाखल पात्र एकून ९५० केसेस असल्याचे समजते पोलीस उपविभागीय अधिकारी डि. बी. तडवी मोर्शी, ठाणेदार राजेश राठोड शिरखेड, सुरेंद्र अहिरेकर वरुड, डि. एम. वानखडे शेदुर्जना घाट, एस. पी. पाटील बेनोडा व सर्व पोलीस कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते या जनता दरबारात एक हजार नागरिकांनी सहभाग घेतला. पोलीस जनतेला मित्र सेवक असून, जनतेचे रक्षण करण्यासाठी अधिकारी पोलीस कार्यरत असतात. तो तुमच्या मधीलच एक नागरिक आहे. कोणत्याही प्रकारच्या गुंन्ह्यात जनतेने पोलिसांना सहकार्य करावे. कोणत्याही तक्रारदारावर अन्याय होणार नाही याची जाणीव संबंधित ठाणेदार कर्मच्यारानी घ्यावी असेही यावेळी उपस्थितांना संबोधीत करण्यात आले. तसेच पोलिसांनी जनतेसोबत मधुर संबंध ठेऊन त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. एकतर पोलीसा विषयी जनसामान्य पोलीस प्रतिमा मालीन झाली आहे सर्वच अधिकारी कर्मचारी सारखेच नसतात एकजण करतो मात्र चिखलफेक सर्वावर होतो पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा चागले काम करतात याची जाण सुद्धा जनतेने ठेवावी असे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप झळके यांनी आपले विचार व्यक्त केले. जनतेने मोठ्या उत्साहाने प्रतीसाद दिल्याने सर्व पोलीस अधिकारी व जनतेमध्ये उत्साहाची लाट दिसून आली.