अमरावती ई-पेपर

विदर्भ राज्य, व अचलपूर जिल्ह्यासाठी पदाधिकाऱयांची वारी परतवाड्यातून

विदर्भ राज्य, व अचलपूर जिल्ह्यासाठी पदाधिकाऱयांची वारी परतवाड्यातून

परतवाडा:- स्वतंत्र विदर्भ राज्य तसेच अचलपूर जिल्हानिर्मितीसाठी विदर्भ राज्य समितीच्या वतीने तालुका शहर स्तरातून कार्यकर्त्यांसह काल दि.८ ला परतवाड्यात हजेरी लावली , त्यात आलेल्या पाहुण्यांचे बंटी केजडीवाल यांनी स्वागत केले .

स्वतंत्र विदर्भ राज्य तसेच अचलपूर जिल्हानिर्मितीसाठी मागील पाच वर्षांपासून सतत झटत, आगामी २०१९ मधे विदर्भ राज्य व अचलपूर जिल्हा निर्मिती व्हावी यासाठी विदर्भ राज्य समितीचे पदाधिकारी तालुक्यातून शहराकडे रॅलीच्या माध्यमातून पोहोचत आहेत .

काल दि. ८ ला स्वतंत्र विदर्भ राज्य समितीचि रॅली परतवाड्यातील जैस्तंभ चौक येथे आगमण होताच रॅलीतील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले . तसेच समितीचे वामनराव चटप, श्रीनिवास आंदेवाले ,प्रबीर चक्रवर्ती, नंदू खेरडे ,राजेंद्र आगरकर, रंजना मामर्डे ,बंटी केजरीवाल आदि मान्यवर यावेळी जयस्तंभ चौक येथे कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते .कार्यक्रमांमध्ये वामन चटप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच कार्यक्रमाचे आयोजक बंटी केजरीवाल यांनी अध्यक्षीय भाषणात अचलपूरचा विकास करायचा असल्यास अचलपूर जिल्हा निर्मिती करणे अत्यावश्यक आहे , यामुळे कारखाने निर्माण होतील व शहरातील बेरोजगारांना रोजगार मिळेल तसेच उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय ,जिल्हा रुग्णालय, जिल्हा शासकीय कार्यालय, खेळाडूंसाठी मैदान, शकुंतला रेल्वेचे रुंदीकरण, अशा अनेक गोष्टींचा फायदा शहरातील नागरिकांना होईल त्यासाठी सर्वांनी एकमत दाखवण्याची वेळ आलेली आहे ,असे बंटी केजरीवाल कार्यक्रमामधे बोलत होते.