अमरावती ई-पेपर

शिरसगाव येथील स्टेट बँकेचा कारभार कासवगतीने कर्मचारी नसल्याने गावकऱ्यांचे हाल

शिरसगाव येथील स्टेट बँकेचा कारभार कासवगतीने
कर्मचारी नसल्याने गावकऱ्यांचे हाल

शिरसगाव प्रतिनिधी== नकुल सोनार

गेल्या कित्येक महिन्यांपासून कर्मचारी कमी असल्यामुळे गावातील नागरिकांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे दिसून येत आहे. बँक मध्ये कोणतीही कामे वेळेवर होत नसल्याने नागरिक त्रस्त झालेले आहे.

बँक मध्ये एक कॅशियर असल्याने कामाला वेळ लागत आहे शिरसगाव कसबा येथे स्टेट बँक मध्ये पुरेसा स्टॉप नसल्या मुळे अशी या बँकेची दशा असल्याची चर्चा सर्व गावात पसरली आहे गावकरी सकाळी दहा वाजता पासून बँकेपुढे येऊन बसलेले दिसून येतात

तर बँक उघडल्यानंतर मोठी गर्दी जमलेली असते कित्येक वेळा काम वेळेवर होत नसल्याने काउंटर लाईन मध्ये भांडणे सुद्धा दिसून येतात तरीसुद्धा याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष का देत नाही असा सवाल नागरिकांमध्ये उठत आहे.

शिरसगाव येथील लोकसंख्या ही 30 हजार राहून जास्त असल्याने व आजूबाजूच्या गावातील सुद्धा सर्वांचे मोठ्या प्रमाणावर व्यवहार या बँकेत आहे. गोरगरीब सुद्धा दोन पैशाची बचत करण्यासाठी बँकेमध्ये जात असतात तेव्हा मात्र बचत होण्यासाठी बँकेत गेलो की त्या दिवसाची मजुरी सुद्धा पाडावी लागत असल्याने आम्ही कुणाकडे तक्रार करावी अशी स्थिती शिरसगाव येथील नागरिकांची झालेली दिसून येत आहे. तेव्हा या समस्या बघितल्या नंतर गावातील कित्येक लोकांचा रोष बँक वरील वाढलेला आहे.
गावातील नागरिकांचे तरुण भारत प्रतिनिधीने प्रतिक्रिया जाणून घेतल्या तेव्हा बँक ही गावातील नागरिकांच्या सोयीसाठी असल्याने गावातील नागरिकांना बँकेची पूर्णपणे सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे यासाठी कित्येक वेळा बँक मॅनेजर गजानन देऊळकर यांच्याशी चर्चा केली असता तेव्हा. आम्ही कर्मचारी वारंवार मागत असल्याचे त्यांनी सांगितले कर्मचारी कमी असल्याने आम्ही पाहिजे त्या सुविधा वेळेवर देऊ शकत नसल्याचे सांगितले. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिरसगाव स्टेट बँक कडे विशेष लक्ष पुरवावे व होणाऱ्या असुविधा टाळाव्यात.