अमरावती ई-पेपर

चिखलदरा येथे दोन दिवस विभागीय क्रीडा स्पर्धा

चिखलदरा येथे दोन दिवस विभागीय क्रीडा स्पर्धा

महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह असोसिएशन चा उपक्रम

राज्यातील संघ होणार सहभागी

चिखलदरा – महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह डिपारमेंट वर्ग 3 असोसिएशन च्या वतीने चिखलदरा येथे दोन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 12 जानेवारीपासून करण्यात आले असून राज्यातील सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.
राज्यात सहकार विभागात वर्ग 3 लेखापरीक्षक म्हणून कार्यान्वित आहे दरवर्षी विभागाच्या ऑडिटर असोसिएशन च्या वतीने विभाग स्तरावर या क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात येते यंदा चिखलदरा येथे हनुमान प्रसारक मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहे या क्रीडा स्पर्धेत कबड्डी, बॅडमिंटन, गोळाफेक, कॅरम रस्सीखेच ,धावणे अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे

यात अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम पुणे यासह राज्यातील अनेक संघातील दीडशे खेळाडू पाचशे अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन सहकारी संस्था लेखापरीक्षण विभागाचे विभागीय सहनिबंधक आर .जे .दाभेराव हे करणार असून प्रमुख अतिथी नगराध्यक्ष विजया सोमवंशी जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव ,जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग एक च्या एस. एस. पांडे , यवतमाळ येथील जिल्हा विशेष लेखापरीक्षक जे. आर. गवळे ,जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक चे के एम सोळंके ,बुलढाण्याचे व्ही के लाहाने, ए एन देशमुख, एस व्ही महंत , महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट ऑडिटर असोसिएशनचे अध्यक्ष सी डी भोयर तसेच विशेष उपस्थिती व्ही एस मसराम,डी पी जाधव, ए जी माकोडे ,बी पी राठोड एस एस देशपांडे व्ही एस पेठे , आर एस जोशी डी पी नागदिवे ,ए एस व्यवहारे यांची उपस्थिती राहणार आहे विभागीय क्रीडा स्पर्धेत सहकार विभागातील लेखापरीक्षण वर्ग तीन च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन विभागीय अध्यक्ष प्रशांत गुल्हाने, अनिल विखे मिलिंद नाईक यांनी केले असल्याची माहिती चादूर रेल्वे चे लेखापरीक्षक तथा क्रीडा प्रतिनिधी रवी उंबरकर यांनी दिली