अमरावती ई-पेपर

स्मार्ट ग्राम योजनेत काशीखेड तालुक्यात प्रथम

स्मार्ट ग्राम योजनेत काशीखेड तालुक्यात प्रथम

रु 10 लक्ष चे पारितोषिक पटकाविले

धामणगाव रेल्वे:– राज्य शासनाच्या तालुका स्मार्ट ग्राम पंचायत स्पर्धेत तालुक्यातील काशीखेळ ग्रामपंचायतीने प्रथम पारितोषिक पटकाविले आहे या पुरस्काराचा मानकरी तरुण विद्यार्थी ठरला आहे.

तरुण पिढीमध्ये सकारात्मक जिद्द व चिकाटी असली तर तो आपल्या कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण गावाचा सर्वांगीण विकास करू शकतो याची प्रचिती बीकॉम शिकत असलेल्या नयन निहीटे त्याच्या सहकारी मित्रांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव स्वच्छता अभियान तसेच स्मशान भुमी स्वच्छता अभियान लोकसहभागातून शेततळे निर्मिती हागणदारी मुक्त गाव नाली सफाई असे नाना विविध उपक्रम राबवून राज्य शासनाच्या अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनेत स्मार्ट ग्राम प्रथम पारितोषिक धामणगाव तालुक्‍यात प्राप्त केले आहे.

रु 10 लक्ष प्रमाणपत्र असे य पारितोषिकांचे स्वरूप असून येत्या प्रजात्ताक दिनी 26 जानेवारी ला जिह्वाधिकारी यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदाब करण्यात येईल.

या स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी काशीखेड ग्रामपंचायत च्या सरपंचां आशा छत्रपती भापकर, उपसरपंच हिरुताई आदमने, ग्रामसेवक मनीष सावळे, ग्राम कर्मचारी सुरेश कैकाळी, यांच्या सोबतच नयन नीहीटे, सागर भजभूजे, कपिल नीहीटे, प्रफुल गावंडे, स्वप्नील भापकर,अनिल बगाडे, आशिष गावंडे, मोरेश्वर ठाकरे, अक्षय यादमाने, गोपाल भापकर,नरेश गावंडे,भारत कावडे,चेतन नीहीटे , धीरज गावंडे सह गावकऱ्यांनी सहकार्य केले.