अमरावती ई-पेपर

समाजोन्नतीच्या कार्यामध्ये सर्वांना सोबत घेण्याची गरज आ. अरुणभाऊ अडसड

समाजोन्नतीच्या कार्यामध्ये सर्वांना सोबत घेण्याची गरज आ. अरुणभाऊ अडसड

शिरजगाव कसबा प्रतिनिधी == नकुल सोनार

समाज संघटन व निरपेक्ष काम करणारी पिढी निर्माण करण्याकरिता व समाजोन्नती करिता सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. अरुणभाऊ अडसड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले ते येथील श्रीराम स्पोर्टिंग क्लब व श्रीराम वाचनालय यांच्यावतीने आयोजित गौरव सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये बोलत होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये अरुणभाऊंनी सांगितले की समाजाच्या भल्याचा विचार न करता वैयक्तिक स्वार्थाचा विचार केल्यामुळे अनेक समाज संघटन विस्कळीत झाले.
समाज म्हणजे जात नव्हे. तर समाज म्हणजे जातीधर्माचा अपेक्षा पूर्ण करणारी व सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या चा विचार करणारे संघटन.
त्यांनी अनेक धार्मिक संतांचे व ऐतिहासिक उदाहरणे देऊन समाजोन्नती करिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा , तानाजी मालुसरे यांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
श्रीराम स्पोर्टिंग क्लब व श्रीराम वाचनालयाच्या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांनी गौरवोदगार काढून, मुलींचे हॉलीबॉल सामने घेतल्याबद्दल श्रीराम क्लबचे अभिनंदन केले तर श्रीराम वाचनालयाला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
प्रारंभी गावातील माजी सरपंच असलेल्यांकडून व आयोजकांकडून विधानपरिषद मध्ये विजयी झाल्याबद्दल अरुण भाऊंचा सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या 188 व्या जयंती निमित्ताने मुलींची सामान्य ज्ञान स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तर श्रीराम स्पोर्टिंग क्लब च्या वतीने महिला हॉलीबॉल सामने स्व. श्रीमती देवकाबाई पारधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते. या सामन्याच्या अंतिम सामना भाऊंच्या उपस्थितीत खेळल्या गेला भाऊंनी सर्वच खेळाडूंचे अभिनंदन केले.
प्रास्ताविक जि.प. सदस्य सुखदेव पवार सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सोनार यांनी केले.