अमरावती ई-पेपर

येवदा प्राथमिक आरोग्य केंद्रास राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त

येवदा प्राथमिक आरोग्य केंद्रास राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त

रिपोर्टर:- अनंत बोबडे

दर्यापुर:- तालुक्यातील येवदा प्राथमिक आरोग्य केंद्राची केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय नई दिल्ली यांचा द्वारे नियुक्त पथकाने दिनंक २२ व २३ नोव्हेंबर रोजी मुल्यमापन केले यामधे येवदा प्रथमिक आरोग्य केंद्रास ८८ टक्के गुनसह राज्यातून प्रथम क्रमांकाने राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य सेवेत सर्वोच् समजल्या जाणारा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली .येवदा परिसरातील 22 गावांच्या 45 हजार लोकसंख्या गावांना आरोग्य सेवा उत्कृष्ट रीत्या पुरवल्या जाते. दवाखान्यामध्ये रुग्णांकरिता उपकरणे तेथील कार्यप्रणाली परिसरातील सुसज्ज व्यवस्था या सर्व गोष्टींवर आधारित राष्ट्रीय पातळीवर येणार्‍या लोकांनी येवदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे निवड केली. राज्यातून पाच केंद्राची या पुरस्कारा करिता निवड झाली आहे त्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये दोन प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड झाली त्यामध्ये येवदा प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड झाली हा पुरस्कार तीन लक्ष रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र या स्वरूपात नावी दिल्ली येथे प्रधान करण्यात येणारं आहे . हा पुरस्कार सर्वोच्च असून प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील, डॉ. मनीषा चव्हाण डॉ. हर्षाली ताडे, डॉ. वंदना पवार, किशोर पवार, श्रीमती ललिता खोंड, सूरेश दिगडे, धनरेषा राठोड, जीवन खेडकर ,श्रीमती पडोळे, शारदा शेंद्रे, गजानन बुंदेले, शरद सावळे तथा सर्व आरोग्य कर्मचारी वर्ग आशा स्वयं सेविका व शिल्पा चारते व दीपिका यावतकर आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रम प्रा. आ. केंद्र येवदा येथे प्रभावीपणे राबविले जातात. या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी मा. मनीषा खत्री C E O डॉ. सुरेश आसोले D H O डॉ. रहाटे, डॉक्टर दिलीप चाराटे डॉ. मंगेश राऊत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच आरोग्य सभापती बळवंत वानखडे जि प सदस्य वंदना करुले, सरपंच प्रदीप देशमुख यांनी सर्व कर्मचारी वृंदाचे अभिनंदन केले.