अमरावती ई-पेपर

चांदुर बाजार नगर परिषदने केला दर्पण दिन साजरा

चांदुर बाजार नगर परिषदने केला दर्पण दिन साजरा

रिपोर्टर:- सुमित हरकूट

चांदुर बाजार:मराठी पत्रकारितेचे जनक बालशात्री जांभेकर यांनी समाज साक्षर करण्यासाठी जानेवारी अठराशे सालात दर्पण हे वृत्तपत्र सुरु केले.हे वृत्तपत्र पहिले मराठी भाषिक ठरले.त्यामुळे दरवर्षी ६जानेवारी हा दिवस दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो.यानिमित्याने चांदुर बाजार येथील पत्रकारांचा चांदुर बाजार नगर परिषद कार्यालयाकडून पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन त्या सर्व पत्रकारांचा सत्कार नगराध्यक्ष रविंद्र पवार व लोकसभेचे भावी उमेदवार उपाध्यक्ष विजय विल्हेकर यांनी सत्कार करून नगर परिषद कार्यालयामध्ये दर्पण दिन साजरा करण्यात आला.
चांदुर बाजार न प कार्यालयामध्ये नगर परिषदच्या तर्फे ६जानेवारी रविवार रोजी दर्पण दिनानिमित्य पत्रकारांचा सत्कार करण्यात आला तेव्हा या कार्यक्रेर्माच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष मधुसूदन कुलथे तर प्रमुख पाहून म्हणून मनोहर सुने,नगराध्यक्ष रविंद्र पवार,उपाध्यक्ष विजय विल्हेकर,अशोक याऊल यांची उपस्थिती होती.यावेळी पत्रकार मदन भाटे,भास्कर हिरडे,विलास पंचभाई,सुमित हरकुट, शरद केदार,पवन बैस,किशोर मेटे,माजीद इकबाल,बादल डकरे,शशिकांत निचत,वैभव उमक,केशव राऊत,रविंद्र औतकर,दिलीपशिंह ठाकूर,राजेश रावळे, प्रभुशिंग पुरोहित आदी पत्रकारांचा नगराध्यक्ष रविंद्र पवार व लोकसभेचे भाजपचे भावी उमेदवार उपाध्यक्ष विजय विल्हेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मनोहर सुने,नगराध्यक्ष रविंद्र पवार,अशोक याऊल ,सुमित हरकूट यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की,वर्तमानपत्र हे समाज जीवनाचा आरसा असून पत्रकारिता म्हणजे त्या आरशातील पारा होय आणि पाऱ्यातील कार्यक्षमता कमी झाल्यास समाज जीवनाचे चित्र धूसर दिसू लागते.यासाठी पत्रकारांनी कार्यक्षमता नेहमी उत्साही ठेवावी व ती संस्कारित समाज रचनेसाठी उपयोगी ठरावी असे मत व्यक्त केले.सदर दर्पण दिनी पत्रकारांच्या सत्कार सोहळ्याला नगर सेवक अतुल रघुवंशी,मनीष नांगलिया,गोपाल तिरमारे,नंदलाल शर्मा,महादेव काकडे,रावसाहेब घुलक्षे,आदी उपस्थित होते.