Breaking News ताज्या बातम्या महाराष्ट्र

साईभक्तांचा एक लाखांचा ऐवज लंपास

साईभक्तांचा एक लाखांचा ऐवज लंपास

नगर: – शिर्डी शहरात कुटूंबियांसह साईदर्शनासाठी आलेल्या साईभक्तांचा सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज गाडीतून चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला.साईभक्त (एमएच १२ युके ८८८९) या गाडीतून आले होते.

नगरपंचायतीच्या समोर असलेल्या पार्कींगमध्ये डॉ. अशोक दलवडी व त्यांचे सर्व सहकारी गाडीमध्ये बॅगा ठेऊन दर्शनासाठी निघुन गेले. त्यावेळी मी लघुशंकेसाठी बाहेर गेलो असता हा चोरीचा प्रकार झाल्याची तक्रार गणेश कपाळे (वय २५, रा. पुणे) यांनी शिर्डी पोलिसात दिली आहे.

साईभक्तांच्या मालकीचा ६५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ४ हजार रुपये रोख, ३० हजाराचे गॉगल व कागदपत्रे चोरीस गेले आहेत. डॉ. दलवडी हे केंद्र सरकारच्या सेवेत जॉईंट सेक्रेटरी आहेत. सोबत संपर्क अधिकारी सुहास काळे होते. त्यांनी बॅग गाडीतच ठेवली होती. शिर्डी पोलिसांनी भादंवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.