Breaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

‘राफेल चोर’ तो ‘राफेल चोर’ वर शिरजोर! : सचिन सावंत

‘राफेल चोर’ तो ‘राफेल चोर’ वर शिरजोर! : सचिन सावंत

चोरी रंगेहाथ पकडली तरी भाजप मुजोर
भाजपचा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!

मुंबई :- माध्यमांमधून प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनावर हल्लाबोल केला अशा खोट्या कंड्या पसरवून ज्याची चोरी रंगेहाथ पकडली गेली तो भारतीय जनता पक्ष मुजोरी करत आहे. दोन किलोमीटर लांब थांबून कोल्हेकुई करणा-या भाजपची राफेल चोर तो राफेल चोर वर शिरजोर अशी अवस्था झाली आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, राफेल चोरांची प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन जवळ येण्याचीही हिम्मत झाली नाही. जर आले असते तर ज्याप्रमाणे चोरांचे स्वागत करतात त्याप्रमाणे काँग्रेस कार्यकर्त्यांनी या राफेल चोरांचे स्वागत केले असते. उगीचच हल्लाबोल वगैरे केला असे म्हणून कंड्या पिकवून शूरपणाचा आव आणल्याने चोरांचा साव होत नाही. भाजपासारख्या चोरांच्या उलट्या बोंबांना काँग्रेस पक्ष भीक घालणार नाही. जोपर्यंत चोरी करणा-या चौकीदाराला शासन होत नाही तोपर्यंत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राफेल चोरीविरूद्ध लढा निकराने सुरु ठेऊ असा इशारा सावंत यांनी दिला.