Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

मंगरूळ चव्हाळा परिसरातील वाळू तस्करीला उधाण

मंगरूळ चव्हाळा परिसरातील वाळू तस्करीला उधाण

साखळी नदी व बेबळा नदीतून केली जातात तस्करी
शेततळे च्या काठावरचा गौण खनिज गेले तरी कोठे

विणेश बेलसरे रिपोर्टर

मंगरूळ चव्हाळा:-
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील साखळी नदीपात्रातून वाळूची तस्करी होत असून मंगरूळ चव्हाळा व निमगव्हान परिसरातील मध्यभागी असलेल्या शेततळ्यातील काठावरील गौण खनिज चोरी जात असून मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे व थेतील विटा बनवण्यासाठी मागील वर्षी मातीची चोरी होत होती शिवानी रसुलापूर येथील बेबळा नदी पत्रातून देखील वाळू ची तस्करी होत आहे रेती तस्करी करण्यासाठी नदी पात्रातील खड्डे शोधले जातात दरोरोज मध्य रात्री च्या वेळी वाळूची तस्करी केली जात असून प्रशासन मात्र ठप्प बसलेले आहे शिंगणापून येथील अनेक धाब्यांवर विना परवाना गौण खनिज टाकले जात आहे या वाळू व गौण खनिज चोरट्याना नांदगाव खंडेश्वर येथील ठाणेदारांचे अभय असल्याचे दिसत असून तहासिलदारांचे ढाबे दणाणले आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे या वाळू उपसा करणार्यांवर कार्यवाही केली जात नाही अखेर कोण कार्यवाही करणार असा प्रश्न निर्माण होत आहे.