Breaking News Uncategorized अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

बेशिस्त दुचाकींवर “कार्यवाही” ! खासगी ट्रक, बसेसला “आशीर्वाद” ?

बेशिस्त दुचाकींवर “कार्यवाही” !
खासगी ट्रक, बसेसला “आशीर्वाद” ?

परतवाडा पोलिसांची “दबंग” कारवाई ?

रिपोर्टर:- आशिष गवई,

परतवाडा ६ / परतवाड्यात वाढत्या वाहतुकीचा झालेला खेळखंडोबा , अवैधरित्या पार्किंग ने थैमान घातल्यानंतर ऊपविभागीय अधिकार्‍यांनी केलेल्या कानऊघडनीनंतर परतवाडा पोलिसांनी परतवाड्यात “हवा काढ” कारवाई केल्याने काल दि. ५ ला पुरूशांना , महिलांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.तर बसस्थानक परिसरात असणाऱया खाजगी वाहनांची हवा परतवाडा पोलीस काढू शकतील का ? याचीही चर्चा मोठय़ा दिमाखात परतवाड्यात सुरू आहे .

अचलपूर परतवाडा शहरामध्ये वाहतुकीचा पार खेळखंडोबा झालेला आहे .यांमध्ये ट्रिपल सीट वाहन चालवीणे , वाहनांची शर्यत लावणे ,सूरू वाहनात मोबाइलवर बोलने, दारू पिऊन वाहन चालवीणे , वेगाने वाहने चालविणे हल्लीच्या दिवसांमध्ये “ट्रेंड” झालेला आहे . अशा बेशिस्तपणे वाहन चालवून अपघातही मोठा प्रमाणात झालेले आहेत. मात्र वाहतूक पोलीस अशा बेशिस्त वाहन चालविण्यार्‍यांवर परमनंट जरब बसविणारी कोणतीही कारवाई करत नाहीत . तर बसस्थानक परिसरामध्ये पोलिसांसमोरच अवैधरित्या खाजगी वाहतूक राजरोसपणे सुरू असते. बसस्थानकापासून खाजगी वाहने २०० मीटर दूर असावे याकडेही पोलीस दुर्लक्ष करतात . प्रवासी वाहनांमध्ये (आॅटो) तीनपेक्षा जास्त प्रवासी नसावेत याची तर कल्पना पोलिसांना आहे की नाही हेच समजत नाही ? एवढे सर्व असताना परतवाडा ठाण्यामध्ये नव्याने आलेले दबंग ठाणेदार मानकर यांनी परतवाडा हद्दीमध्ये रस्त्यांवर दुकानांपुढे हॉटेलसमोर अवैध रित्या दुचाक्या पार्किंग करणाऱ्यांवर हवासोड कारवाई केली आहे . मात्र ही हवा सोडा कारवाई फक्त दुचाकींसाठीच का ? असा सवाल नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे. तर बसस्थानक परिसर, जयस्तंभ चौक, लाल पूल ,या ठिकाणी तासंतास दिवसेंदिवस अवैधरित्या उभे

असणारे खाजगी बसेस, ट्रक, ट्रॅक्टर, विरुद्ध दिशेने येणारे मोठमोठाली वाहने , दिवसभर पार्क करून ठेवलेली असतात, त्यांच्यावर परतवाडाचे ठाणेदार कारवाई करतील का ? याकडे जुळ्या शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे .

शहरातील अस्ताव्यस्त वाहतुकीवर लवकरच अंकुश लागेल ,नागरिकांनी अवैध पार्किंग आढळल्यास ठाणेदारांची संपर्क साधून सहकार्य करावे
पोपट अब्दागिरे
उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर

पोलिसांनी धनदांडग्यांना सोडून सामान्य जनतेवरच हवा सोड कारवाही केली , बसस्थानक , जयस्तंभ चौक , लालपुल, येथे तासांत तास खाजगी जड वाहने उभी असतात त्यांच्यावर पोलीस कारवाई करून दाखवतील काय ?
दीपक घाटे ,
भाजपा शहर ऊपाध्याक्ष परतवाडा

वर्षभराच्या वाढत्या गुन्हेगारी ने नागरिकांचा पुलिस प्रणाली वर रोष आहे, दुचाकी मधील हवा सोडून काही होणार नाही, शासकीय संयुक्ततिकरीत्या पार्किग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, नंतर रस्त्यांवर अडथडा निर्माण करणाऱ्यांवर वाहन उचलून नेण्याची कारवाई करावी .
योगेश खानजोडे
सामाजिक कार्यकर्ता

पोलिसांनी देखावा करू नये ,शहरामध्ये गांजा विक्री, अवैध धंदे ,जुगार, खुलेआम सुरू आहेत. गुन्हेगारांना पकडण्याचे सोडून पोलिसांनी सामान्यांना त्रास देऊ नये . चोऱ्या करणारे चेन स्नॅचिंग बॅगलिफ्टिंग करणाऱ्यांना पोलिसांनी पकडावे !

अभिजीत सरोदे
युवक कॅांग्रेस