Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ २४ तास रिपोर्टर

९५रक्तदात्यांनी रक्तदान करून बाबासाहेबांना वाहली आदरांजली

९५रक्तदात्यांनी रक्तदान करून बाबासाहेबांना वाहली आदरांजली

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाहन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद

धामणगाव रेल्वे/प्रतिनिधी

रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज गुरुवारी,६डिसेंबर रोजी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाहन दिनानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन धामणगाव रेल्वे येथील नगरपरिषद जवळ केले होते भीम सैनिकासह नागरिकांनी यात उत्फुर्तपणे सहभागी होतं९५जणांनी रक्तदान करत बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.

गेल्या ४ वर्षांपासून धामणगाव रेल्वे येथील सामाजिक कार्यकर्ते हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम राबवित आहे यंदा रक्तदानाचे ५वे वर्ष होते .सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराला सुरवात करण्यात आली.

जवाहरलाल नेहरू वैदयकीय महाविध्यालय सावंगी मेघे येथील डॉ. भुरभुरे,डॉ देशमुख व त्यांच्या चमूने रक्तसंक्रमन केले. यात सकाळ पासुनच नागरिकांनी सहभागी होत रक्तदान शिबीराला भेट दिली. यात ९५ रक्तदात्यांनी रक्तदान करत बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल वहिले,प्रवीण हेंडवे,राजेंद्र बोरकर,सुनील ढाणके,मंगेश सोनोने,अजय तुपसुंदरे,सुनील थुल,सचिन पाटील,छंदक हगवने, भीमराव सहारे,छगन जाधव,प्रशांत मुन,गणेश टाले ,अनुप पुरोहित, पवन अग्रवाल, अभय हेंन्डवे,अतुल टाले,ज्योती पाटील,प्रदीप भुसारी,शैलेश बोरकर, मिलींद वाहिले, सह आदींनी परिश्रम घेतले