Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाहन दिनानिमित्त  रक्तदान शिबीराचे आयोजन

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाहन दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

धामणगाव रेल्वे येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा उपक्रम

धामणगाव रेल्वे/प्रतिनिधी

रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरुवारी,६ डिसेंबर रोजी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाहन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन शहरातील नगरपरिषद प्रांगणात करण्यात आले आहे.

मागील ४ वर्षांपासून शहरातील येथील सामाजिक कार्यकर्ते रक्तदान शिबिराचा कार्यक्रम अविरत राबवित आहे. हे रक्तदान शिबिराचे ५ वे वर्ष आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाहन. दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रम राबविण्यात येऊन आदरांजली वाहण्यात येते मात्र धामणगाव रेल्वे येथे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे या रक्तदान शिबिरात रक्तदान करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रक्तदान करून यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.