Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा अमरावती जिल्ह्यात; प्रत्येक घटकांची भाजपाने फसवणूक केली-अशोक चव्हाण

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा अमरावती जिल्ह्यात; प्रत्येक घटकांची भाजपाने फसवणूक केली-अशोक चव्हाण

धामणगाव रेल्वे । अच्छे दिनचा नारा देत भाजपा सरकारणे जनतेला मोठं मोठे आश्वासन दिले मात्र सरकारने देशात अराजकता माजवत सर्व सामान्य माणसाची प्रत्येक घटकाची फसवणूक केली गॅस पेट्रोल डिझेल किमती वाढवून जनतेची दिशाभूल सरकारने केली राज्यातील सेना भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असून या मिलीभगत सरकारला उखडून फेकण्याची वेळ आता जवळ आली आहे त्यामुळे जनतेने आता सावध राहून काँग्रेस पक्षाला साथ द्यावी असे आवाहन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा राज्यात फिरत असून आज मंगळवारी सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे पोहचली त्यावेळी अशोक चव्हाण बोलत होते.RBI CBI मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा देशातील संविधानिक संस्था संपावल्या आहे दुष्काळा संदर्भात अनेक घोषणा केल्या मात्र त्याचा फायदा झाला नाही सरकारला भीक लागली आहे देशाला अघोषित आणीबाणी लादली जात असून जनतेचा व सरकारचा आवाज दाबल्या जात आहे. सरकार आता स्वतः भिकारी झाले आहे त्यांना आता काय मागायचं?असा सवालही त्यांनी केला.राज्यातील मराठयांना सरकारने आरक्षण दिल मात्र धनगर आणि मुस्लिमांचा काय यावर सरकार काही बोलत नाही त्यामुळे धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस नेते वसंत पुरके, बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव आमदार यशोमती ठाकूर, विरेंद्र जगताप सह आदी उपस्थित होते. काँग्रेसची जण संघर्ष यात्रा अमरावती जिल्ह्यात दोन दिवस फिरणार असून मोर्शी, वलगाव सह आदी ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.