Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

गुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:

गुलाबराव महाराजांच्या पालखीचे आळंदीला प्रस्थान:

रिपोर्टर:- नकुल सोनार

आळंदी:- श्री संत गुलाबराव महाराज श्री क्षेत्र भक्तिधाम येथून श्री संत ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा निम्मित श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत गुलाबराव महाराज याच्या पालखीने प्रस्थान केले.
‌ प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराज भक्तिधाम येथे श्री क्षेत्र आळंदी कडे पालखी प्रस्थान करिता दिडी सोहळा 26 तारखेला भक्तिधाम येथे सप्पन झाला। दुपारी चार वाजताच्या सुमारास श्री संत गुलाबराव महाराज पालखी दिंडी सोहळा ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात मृदंग टाळ व वारकराच्या हरिभजनात मार्गक्रमण करीत शहरातून निघाला असताना डोळ्याचे पारने फेडणारा पालखी दिंडी सोहळ्याची जाजोगागी शहरात स्वागत करण्यात आले।

या भक्ती सोहळ्यात मोठ्या संख्येने महाराजाचे भक्ताची लाक्षणिक उपस्थिती पाहायला मिळाली।
‌ शहरातून पालखी मार्गक्रमित करीत चांदुर बाजार येथे रात्रीचा मुक्काम माऊली भक्त रामेश्वर राऊत याच्या घरी करीत. सकाळी 8 सुमारास बसने प्रवास करीत पालखी अमरावती , मूर्तिजापूर, खामगाव, औरंगाबाद , देहू आळंदी असा पालखीचा प्रवास करीत आठ दिवसाचा प्रवास करीत गीताजयत्तीभक्तिधाम येथे पोचणार आहे। पालखी सोहळ्यात भक्तिधाम चे अध्यक्ष मनोहर किरकट्टे, सचिव पंडित मोहोड, राजेंद्र मोहोड, दीपक कलमखेडे व सहित माऊली भक्त मोठया सख्यने उपस्थित होते।