Breaking News ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर

प्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा

प्रहार नगरसेवकाचे अनोखे आंदोलन; घंटागाडी चालवत आणला नगरपालिकेवर कचरा

प्रतिनिधी कल्पक वाईकर

यवतमाळ : एकेकाळी यवतमाळ नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्रात आघाडीवर होती. स्वच्छता अभियानात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक ही या नगरपालिकेने पटकावला होता. मात्र, आज नगरपालिकेच्या कुठल्याही प्रभागात गेले असता कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, गटारे आढळून येत आहे.आज पालिकेची सर्वसाधारण सभा असल्याने या सबेच्या कक्षासमोर प्रहार पक्षाचे नगरसेवक नितीन मिर्झापूरे यांनी घंटागाडी चालवीत कचरा वाहून आणला.

संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, यवतमाळ शहरात या अभियानाचा कुठलाच ठावठिकाणा दिसून येत नाही. शहरात कुठेही फेरफटका मारा कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, गटारे हे आढळून येत आहे. या पालिकेवर भाजपची सत्ता असून स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्याचे काम त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोपही नगरसेवक नितीन मिर्जापुर यांनी केला आहे. नगरपालिकेने मोठा गाजावाजा करीत सहा महिन्यापूर्वी प्रत्येक प्रभागात करिता दोन अँपे वाहन कचरा उचलण्यासाठी आणण्यात आल्या. अशा एकूण 68 गाड्या असून सुद्धा सहा महिन्यापासून ह्या धूळखात पडून आहेत. केवळ देखावा म्हणून दिवाळीच्या मुहूर्तावर या घंटागाड्या चे उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून या गाड्या नगरपालिकेच्या वाहन तळामध्ये शोभेच्या वस्तू म्हणून असल्याचेही यावेळी आरोप करण्यात आला.

घंटागाड्या म्हणून खरेदी करण्यात आलेल्या वाहने याची निविदा प्रक्रिया पूर्णतः चुकीची झाली आहेत. केवळ कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठी भाजपच्या काही नगरसेवकांनी ही वाहने खरेदी केल्याचा आरोपही नितीन मिर्जापुर यांच्याकडून करण्यात आला. जनतेला सेवा न देता केवळ पालिकेकडून राजकारण केल्या जात आहे. त्यामुळे तातडीने प्रत्येक प्रभागात कचरा उचलण्याची व्यवस्था नगरपालिकेने करावि अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन प्रहार च्या वतीने करण्यात येईल असा इशाराही प्रहारचे नगरसेवक नितीन मिर्जापुर यांनी दिला आहे.