Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या

भारतीय जैन संघटनेच्या नांदगांव खंडेश्वर तालुका अध्यक्ष पदी सतिश सव्वालाखे तर सचिव पदी नमित जैन

भारतीय जैन संघटनेच्या नांदगांव खंडेश्वर तालुका अध्यक्ष पदी सतिश सव्वालाखे तर सचिव पदी नमित जैन

नांदगांव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी भारतीय जैन संघटनेच्या नांदगांव खंडेश्वर तालुका अध्यक्ष पदी सतिश सव्वालाखे यांची एकमताने निवड करण्यात आली असुन त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन केले जात आहे. भारतीय जैन संघटनेची बैठक नुकतीच २३ नोव्हेंबर ला नांदगांवातील जैन स्थानक येथे पार पडली. यामध्ये सामजिक कार्यकर्ते सतिश सव्वालाखे यांची संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हस्तीमलजी बंब, अभय गांधी, सुभाष कोटेचा यांच्या हस्ते सन्मानित करुन नांदगांव खंडेश्वर तालुका अध्यक्ष पदी तर सचिव पदी अमित जैन यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष आणि सचिव यांचे सकल जैन समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी जैन समाजातील इयता दहावी ला ९३% गुण मिळवणारी साक्षी धर्मेंद्र जैन यांचा सन्मान पत्र देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी मानकचंद जैन, किशोर जैन, प्रदिप सव्वालाखे, पद्माकर पोफळी, रमन जैन, मनोज जांगडा, नमित जैन, सागर सव्वालाखे जैन, दत्ता शिरभाते यांची उपस्थिती होती.