Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या

परातवाड्यात १७ टण धाण्यसाठा जप्त अचलपुर पुरवठा अधिकाऱ्यांची धडक कारवाई

परातवाड्यात १७ टण धाण्यसाठा जप्त

अचलपुर पुरवठा अधिकाऱ्यांची धडक कारवाई

रिपोर्टर:- आशिष गवई

परतवाडा:- परतवाड्यात पुरवठा अधिकाऱ्यांनी गोदामावर धाड टाकून जवळ पास १७ टन घान्यसाठा जप्त केलेला आहे.

बैतुल मार्गावरील रशीद अशरफ टोपली यांच्या खाजगी धान्य गोदांमवर दि.१४ ला दुपारी 3.30वाजेच्या सुमारास अचलपुरच्या पुरवठा अधिकारी प्रदीप भगत यांनी धाड टाकल्याने एकच खळबळ उडाली. या टाकलेल्या धाडीमध्ये 80 पोते गहू 50 किलो वजनाचे,242 तांदूळ पोते 50 किलो वजनाचे,21 पोते तूरडाळ,वजन काटा,शिलाई मशीन,सुतळी, शिलाईचा धागा,चाळणी आदी साहित्य व धान्यसाठा संशयास्पद आढल्याने पुरवठा निरीक्षक प्रदीप भगत आणि श्रीकांत मोयजे यांनी सर्व धान्यसाठा व साहित्य जप्त केले त्यानंतर पंचनामा करून सर्व धान्यसाठा व साहित्य जप्त केलेले आहे. धान्यसाठ्यापैकी गहू कृषी उत्त्पन्न बाजार समितीतील अडत विक्रेते ब्रिजेशकुमार जयप्रकाश शर्मा,राजेशकुमार मोहनलाल अग्रवाल,नरेंद्र बंस गोपाल अग्रवाल,संतोष गुलाबचंद जैन,सत्यनारायण जगन्नाथ पुरोहित,प्रकाशचंद ताराचंद अग्रवाल,संदीप मोहनलाल अग्रवाल,रमण श्रीकिसन शर्मा,काठोडे ट्रेडर्स यांच्याकडून खरेदी केल्याचे रशीद टोपली यांनी सांगितल्याने बाजार समितीमध्ये असणाऱ्या आडत्या व्यावसायिकांची सुद्धा धाबे दणाणले आहेत . तसेच खरेदी बिलाच्या झेरॉक्स सादर केल्या तर तांदुळाची खरेदी आर्य ट्रेडिंग कंपनी गोंदिया येथून खरेदी केल्याची झेरॉक्स बिले सादर केले तसेच तूरडाळ हि परतवाडा येथील गोपाल अँड गोपाल मधून खरेदी केल्याचे बायनात सांगितले मात्र याबाबत चे बिले दाखविले नाही त्यामुळे गोपाल अँड गोपाल चे मालक राम भिकुलाल तिवारी यांचे बायान नोंदविले असता रशीद टोपली यांनी कोणत्याही प्रकारचे धान्य खरेदी केली नसल्याचे सांगितले त्यामुळे रशीद टोपली यांनी दिलेल्या बायनात माहिती खोटी आढल्याचे निष्पन्न झाले तसेच गोदामातील इतर साहित्य संशयास्पद आढल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर धान्याचा काळा बाजार करण्याच्या हेतूने साठा केल्याची दाट शक्यता आहे . संशयामुळे रशीद टोपली याच्यावर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील कारवाई व सखोल चौकशीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविला अाहे.

निर्भय जैन , तहसिलदार अचलपुर