Breaking News ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर

टी-1 वाघिणीच्या दहशतीखालील शेतकरी, शेतमजुरांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून दखल

टी-1 वाघिणीच्या दहशतीखालील शेतकरी, शेतमजुरांनाशासनाने नुकसानभरपाई द्यावीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून दखल ना. संजय राठोड आज पांढरकवडा येथे घेणार आढावारिपोटर कल्पक वाईकरयवतमाळ,दि. 13 – राळेगाव, पांढरकवडा आणि कळंब तालुक्यात नरभक्षक टी-1 वाघिणीच्या दहशतीमुळे काम, धंदे बंद पडल्याने या भागातील शेतकरी, शेतमजुरांना शासनातर्फे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री महसूल राज्यमंत्री संयज राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून वाघिणीच्या दहशतीची, तिच्या हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबांची, या परिसरातील भयभीत जनतेची सर्व माहिती जाणून घेतली. या पार्श्वभूमीवर ना. संजय राठोड यांनी रविवार 14 ऑक्टोबर रोजी पांढरकवडा येथे या वाघिणीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या विशेष पथकातील अधिकाऱ्यांसह वन, महसूल व अन्य सर्व विभागांसह टी-1 कॅप्चर मोहीमेची आढावा बैठक बोलावली आहे.गेल्या दोन वर्षांपासून राळेगाव, पांढरकवडा, कळंब परिसरातील जंगलात वास्तव्य असलेल्या या वाघिणीची नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. वाघिणीने आतापर्यंत 13 नागरिकांना ठार केले. असंख्य जनावरांचाही फडशा पाडला. या वाघिणीसोबत तिचे दोन बछडेही असल्याने आता नागरिकांनी शेतीची कामेही बंद केली आहे. वाघिणीच्या दहशीतीमुळे या भागातील 25 ते 30 गावांमध्ये शेतकऱ्यांनी शेती पडीक ठेवल्याने रोजमजुरीची कामेसुद्धा बंद आहेत. त्यामुळे या भागातील रोजगार बुडाला आहे. शेतीत कोणतेही उत्पादन घेता येत नसल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान सुरू आहे. शासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून पीडितांना न्याय, उपजिविका थांबलेल्या शेतकरी, शेतमजुरांना नुकसानभरपाई देण्यासोबतच ही वाघिण तिच्या बछड्यांसह जेरबंद करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, यासाठी उपाययोजना करण्याबाबत पुढाकार घेण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी ना. संजय राठोड यांना दिले. नरभक्षण वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आलेला हत्ती बेफाम होऊन त्यात एक महिला ठार झाल्याची दखल घेत, उद्धव ठाकरे यांनी वनविभागाच्या या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली.वन्यजीव आणि मानवातील संघर्ष नवा नाही. परंतु, एका वाघिणीच्या हल्ल्यात 13 लोकांचा जीव जाणे, ही बाब निश्चितच गंभीर असून यात हलगर्जीपणा होता कामा नये, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. या वाघिणीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली. नामवंत शिकाऱ्यासह हत्ती, घोडे, शिकाऊ कुत्रे, पॅराग्लायडर, ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही निगराणी आणि शेकडो वन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात असताना त्या भागातील नागरिकांना विश्वासात घेऊनच ही परिस्थिती हाताळावी अशा सूचना त्यांनी ना. राठोड यांना केल्या.या वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबाला आर्थिक भरपाई, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि परिसरात शेती व्यवसाय बंद झालेल्या शेतकरी, शेतमजुरांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही चर्चा करून योग्य मार्ग काढण्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ना. राठोड यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या मोहिमेची जबाबदारी सांभाळणारे अपर मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली व सूचना केल्या. नागरिकांना या वाघिणीच्या दहशीतीतून मुक्त करण्याचा ध्यास घेऊन मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना त्यांनी लिमये यांना केल्या. या पार्श्वभूमीवर ना. संजय राठोड यांनी टी-1 कॅप्चर मोहीमेची आढावा बैठक उद्या रविवारी पांढरकवडा येथे बोलावली-