Breaking News ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या यवतमाळ विदर्भ २४ तास रिपोर्टर

यवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा :जिल्हा काँग्रेस कमिटी

यवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा :जिल्हा काँग्रेस कमिटी
रिपोटेर कल्पक वाईकर
यवतमाळ:
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन आज दि 13 ऑक्टोबर रोजी स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात केले होते, या बैठकीत यवतमाळ जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा, राळेगाव येथील टी 1 या वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, आर्णी येथील बलिकेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध, महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून प्रत्येक तालुक्यात शिबिरांचे आयोजन करणे, प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल नुसार बूथ समित्या चे गठन करून प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे आदी मुद्यांवर या वेळी चर्चा करण्यात आली तसेच लोकमत आयडॉल म्हणून बहुमान मिळाल्या बद्धल प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस श्याम बाबू उमाळकर यांचा, नवं नियुक्त युवक काँग्रेस चे अध्यक्ष अतुल राऊत यांचा, व जिल्हा काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष राजू कासावार यांचा सत्कार करण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्षांना यांना लोकहितार्थ कामांना प्रत्येकी पाच लक्ष रुपये देण्याच्या निर्णयाचा अभिनंदनाचा ठराव दारव्हा तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे यांनी मांडला व त्याला अनुमोदन बाभूळगाव तालुकाध्यक्ष डॉ रमेश महानूर यांनी दिले.
या वेळी जिल्हाध्यक्ष आ डॉ वजाहत मिर्झा, प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस श्याम बाबू उमाळकर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आ वामनराव कासावार, बाळासाहेब मांगुळकर, राहुल ठाकरे, अरुण राऊत, जीवन पाटील, बाबा साहेब गाडे पाटील, डॉ टी सी राठोड, अनिल गायकवाड, जाफर खान, दिनेश गोगरकर, शब्बीर खान, अतुल राऊत, कौस्तुभ शिर्के, सय्यद इस्थेहाक, सय्यद इरफान,यांचे सह अनेक काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते बैठकीचे आभार यवतमाळ शहर अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी यांनी मांडले