Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या

नगरसेवक तिरमारेचे राहूटीमध्ये अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस

नगरसेवक तिरमारेचे राहूटीमध्ये अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस
उपोषणातील राऊत यांची प्रकृती खालविली

रिपोर्टर :- सुमित हरकूट

चांदुर बाजार :-अचलपूर मतदार संघातील मागण्या संदर्भात अनेक दिवसांपासून संबंधित विभागाशी सतत पाठपुरावा करून शासन व प्रशासनाने कोणतीही दखल न घेता अचलपूर मतदार संघातील शेतकऱ्यांचा विकास गेल्या कित्येक वर्षाच्या प्रलंबित कामाने कोसोदूर गेला आहे. त्या कामाला गती येण्याच्या दृष्टीकोनातून चांदुर बाजार नगर सेवक गोपाल तिरमारे यांनी अचलपूर मतदार संघातील मागण्या संदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने ८ऑक्टोबर पासूनचांदुर बाजार येथील नेताजी चौकात राहुटी उभारून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.आज अन्यत्यागाचा पाचवा दिवस असून एका उपोषन कर्त्याची प्रकूति खालावल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.
अमरावती जिल्हयात अचलपूर आणि चांदुर बाजार तालुक्यातील वासनी बु प्रकल्प,भागाडी प्रकल्प,बोर्डी नाला मध्यम प्रकल्प,बोरगाव मोहना प्रकल्प, करजगावं लघु प्रकल्प अशा काही प्रकल्पाचे काम सुरु आहे. परंतु सदर काम बऱ्याच काळापासून रखडले असल्याने त्याचा शेतकऱ्यांना अद्याप कुठलाच फायदा झाला नसल्याने त्या रखडलेल्या प्रकल्पाच्या कामास त्वरित सुरुवात करण्यात यावी. असल्या 11 मागण्या साठी भाजपाचे युवा मोर्चाचे तालुका उपाधयक्ष तथा उपोषणकर्ते गजानन राउत व नगरसेवक गोपाल तिरमारे पाच दिवसापासून उपोषवर बसले होते. मात्र गजानन राऊत यांची प्रकृती बिघडली असून त्यांची शरीरातील रक्तदाब व साखर चे प्रमाण कमी झाल्या मुळे व वजनही घटल्या मुळे त्यांना आज तातळीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे.
विशेष म्हणजे नगर सेवक हे भाजपातुन निवडून आले होते.तसेश या उपोषणा मध्ये भाजपाचे युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष ही सहभागी आहे.मात्र आज उपोष्ण कर्यत्याचा पाचवा दिवस असताना भाजपाचे वरीष्ठ नेत्यांनी बातमी लिहेपर्यत कोणीही उपोषण मंडपाला भेट दिली नसल्याने उपोषण मंडपा मध्ये चर्चाला उधान आले होते.