Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र

अन्न औषधी प्रशासनाच्या आशीर्वादाने शहरात गुटखा विक्री ~ मनसे अधिकाऱ्यांवर करावी निलंबनाची कारवाई

अन्न औषधी प्रशासनाच्या आशीर्वादाने शहरात गुटखा विक्री ~ मनसे
अधिकाऱ्यांवर करावी निलंबनाची कारवाई

रिपोर्टर:- आशिष गवई

परतवाडा / अचलपूर परतवाड्यात मागील वर्षभरापासून अवैधरित्या गुटखा विक्री सुरू असल्याने तरुण पिढी बरबाद होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष विजय पोटे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ वेंकट राठोड यांना गुटखा विक्री त्वरीत बंद करण्याकरिता निवेदन दिले आहे .
अचलपूर परतवाडा शहरात महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार गुटखा बंदी आहे परंतु शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत येथील अन्न औषधी प्रशासनाच्या निष्ठूर ,मठ्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने शहरात बिना रोखटोक अवैधरित्या गुटखा विक्री सुरू आहे . त्यामुळे कुणाची भीती न बाळगता शहराच्या मुख्य चौकात तसेच शाळा परिसरात गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. अन्नऔषध प्रशासनाच्या आशीर्वादानेच गुटखा विक्री करणाऱ्यांना कुणाचाही धाक ऊरलेला नाही. पोलिसांनाही ते जुमानत नाहीत असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे .त्यामुळे आता गुटखा व गुटखा विक्रेत्यांवर कारवाई न करता थेट अन्नऔषध प्रशासनाच्या निर्लज्ज व बेकार अधिकाऱ्यांवरच शासनाने कारवाई करावी यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अचलपूर यांना दि. ०१ ला निवेदन दीले आले .