Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ २४ तास रिपोर्टर

. राम मेघे इंन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेरा-अमरावती महाविद्यालयात आय.ई.टी.ई. च्या राष्ट्रीय परिषदेचे ऐतिहासिक उदघाटन

प्रा. राम मेघे इंन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च,

बडनेरा-अमरावती महाविद्यालयात
आय.ई.टी.ई. च्या राष्ट्रीय परिषदेचे ऐतिहासिक उदघाटन

केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराज अहीर यांची प्रमुख उपस्थिती

चंद्रयान व इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचा समावेश

अमरावती:-
आय.ई.टी.ई. च्या 61 व्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे शानदार उदघाटन केंद्रिय गृहराज्यमंत्री मा. हंसराज अहीर, आय.ई.टी.ई. चे राष्ट्रीय उध्यक्ष मा. डॉ. रेड्डी, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष मा. प्रा. (डॉ.) हेमंत देशमुख, कोषाध्यक्ष मा. श्री. पंकज देशमुख, सचिव मा. श्री. युवराजसिंग चौधरी, कार्यकारी सदस्य मा. श्री. नितीन हिवसे, मा. अॅड. उदय देशमुख, मा. प्रा. गजानन काळे, मा. प्रा. सौ. रागिणीताई देशमुख, डॉ. चौधरी, डॉ. हुडा, आय.ई.टी.ई. अमरावती चे अध्यक्ष डॉ. प्रशांत इंगोले, डॉ. अमोल बोडखे, डॉ. एम. एस. अली यांच्या उपस्थीतीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत इंगोले, यांनी केले यावेळी त्यांनी कार्यक्रमाची रुपरेषा व आय.ई.टी.ई. चे कार्य सांगीतले.
मा. डॉ. नितीन धांडे यांनी आपल्या भाषणात मा. हंसराजजी अहीर यांचे कार्यक्रमास उपस्थित राहल्याबद्दल आभार मानले व उपस्थित सर्व सन्माननिय शास्त्रज्ञांचे स्वागत केले. डॉ. हुडा यांनी तात्रीक बाबी व उद्याचे तंत्रज्ञान व महाविद्यालय यांच्यातील दरी दुर करणे आवश्यक असल्याचे सांगितले व अमरावती आय.ई.टी.ई. चे कौतुक केले.
यावेळी पद्मश्री ले. कर्नल दिवाकर सेन यांनी डॉ. शिवम यांचा जीवन परिचय दिला व त्यांचे शोधकार्य समजावुन सांगितले. डॉ. टी. एस. चौधरी यांच्या कार्याची माहीती दीली. पद्मश्री डॉ. टी हनुमान चौधरी यांना त्यांच्या कार्याबद्दल जिवन गौरव पुरस्कार देण्यात आला. आर. के. गुप्ता, दुरदर्शन यांना सुध्दा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच आर. के. गुप्ता यांचा जिवन परीचय यावेळी देण्यात आला. फ्री टु ऐयर ही संकल्पना त्यांची असुन ब्रॉड कास्टींगच्या विश्वात त्यांचे कार्य बहुमुल्य आहे.

यावेळी डी.आर.डी.ओ. चे के. लक्ष्मीनारायण यांचा जीवन परीचय देण्यात आला त्यांनी डी.आर.डी.ओ. मध्ये 37 वर्षे प्रकल्प संचालक म्हणुन सेवा दिली यावेळी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

तसेच डॉ. एन. एच. कोरी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला त्यांनी 40 वर्षे आपली टेलीकम्युनीकेशनला सेवा दिली तसेच संशोधन केले.
या वेळी दिल्ली आय.ई.टी.ई. सेंटरला उत्कृष्ट सेंटरचा पुरस्कार देण्यात आला. द्वितीय क्रमांक पुरस्कार बँगलोर या देण्यात आला. उपकेंद्राचा पुरस्कार यवतमाळ केंद्राला देण्यात आला.यावेळी पाकमंत्री मा. प्रविण पोटे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रिय राज्यमंत्री मा. हंसराज अहीर यांनी आय.ई.टी.ई. चे अभिनंदन व कौतुक केले व विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती चे कौतुक केले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन हेशहितामध्ये आहे. अविष्कार व संशोधन आपल्या भारताची परंपरा असल्याचे सांगितले.

आपल्या अध्यक्षिय भाषणात डॉ. रेड्डी यांनी कार्यक्रमाला आलेल्या संशोधकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. निकु खालसा व प्रा. मैथीली देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाला चंद्रयान 2 चे उपसंचालक डॉ. चंद्रकांता कुमार, इस्त्रोचे संचालक सिवन त्याचप्रमाणे ट्रायचे माजी अध्यक्ष चौधरी तसेच अमेरीकेहुन हॉडली विद्यापीठाचे डॉ. प्रसाद शास्त्री व वेललॅबचे माजीसंचालक डॉ. एम. एच. कोरी, डॉ. कासट, डॉ. अजय ठाकरे, प्रा. संजय धोपटे, डॉ. एच. आर. देशमुख व आय.ई.टी.ई. चे पदाधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.