Breaking News अमरावती कृषिपुत्र ताज्या बातम्या

विदर्भात पुन्हा अरुणोदय झाला

विदर्भात पुन्हा अरुणोदय झाला,

अरुण अडसड यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड

अमरावती:- भाजपा चे जेष्ट नेते अरुण अडसड यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्या नतंर पहिल्यादाच आज शनिवार ला सकाळी बडनेरा येथे आगमन होताच भाजपा कार्यकाऱ्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.

नगरागमन झाल्याने कार्यकर्त्या मध्ये उत्साह संचारला होता. भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती, फटाक्याच्या आतिषबाजीत भाऊंचे
स्वागत करण्यात आले.

असा आहे भाऊचा आजचा धामणगायेथील दौरा

दुपारी 3 वाजता विरुळ मार्गे चांदूर रेल्वे वरुण त्यांचे आगमन होणार असून मारोती मंदिर सर्वोदय कॉलनी येथून त्यांचे स्वागत रैली निघनार ही रैली शात्री चौक, नगर परिषद, टिळक चौक, सिनेमा चौक, मेन रोड,गांधी चौक, रेल्वे गेट, मार्गे कॉटन मार्केट चौक, वरुण शहीद भगतसिंग चोकात पोहचल्यावर जाहिर सभे द्वारे समारोप करण्यात येणार आहे .

आमदारहून नामदाराकडे जाण्याचे संकेत

धामणगाव मतदार संघातून अडसड दोनदा आमदार बनले, यावेळी मात्र त्यांच्या धामणगाव विधानसभा मतदार संघात निसटता पराभव झाल्यानंतर भाजपा चे जेष्ठ नेते म्हणून नामांकित असलेल्या अडसडाना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर यात ते बिनविरोध निवडून आले. आता मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अडसड माजी आमदाराहून नामदाराकडे जाण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहे