Breaking News अमरावती ई-पेपर कृषिपुत्र ताज्या बातम्या महाराष्ट्र

2 ऑक्टोबर ला धामणगावात बीज महोत्सव

2 ऑक्टोबर ला धामणगावात बीज महोत्सव

विदर्भातील शेतकऱ्यांची हजेरी:नामवंत शेतकऱ्यांचे मार्गदर्शन

धामणगाव रेल्वे:- खरीप हंगाम संपत असतांना आता रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. धामणगाव शहरात नवधान्य व लोकबीज विद्यापीठाच्या वतीने २ ऑक्टोबर मंगळवार ला देशी बियाण्यांचा बीज महोत्सव स्थानीय पसारी धर्मशाळा रेल्वे फटकाजवळ आयोजित करण्यात आला आहे.

तालुक्यातील दीड हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या भिल्ली या गावात मागील १६ वर्षांपासून रमेश साखरकर देशी बियाणे व नवधान्य अभियान तालुक्यात राबवित आहे.त्यांच्याकडे तब्बल दोनशे प्रकारच्या देशी बियाण्यांचा संग्रह असून त्यांनी आदर्श बीज ग्राम म्हणून गावात तयार केले आहे.

तालुक्यातील भिल्ली येथे लोकबीज विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी दहा शेतकऱ्यांचा कोअर ग्रुप तयार करण्यात आला आहे. विदर्भातील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी यंदा रबी हंगामात त्यांच्या शेत जमिनीत देशी बियाण्याची लागवड शेती करणारे शेतकरी येथे उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे शेत हेच या लोकबीज विद्यापीठाचे शेत म्हणून संबोधण्यात येते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर लोकबीज विद्यापीठ प्रकिया करून त्यांच्या मालाला बाजार पेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो.

विदर्भातील शेतकऱ्यांची होणार गर्दी

या देशी बीज महोत्सवाला विदर्भातील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी हजेरी लावणार आहेत.यावेळी रमेश साखरकर शेतकऱ्यांना रबी हंगामातील बियाण्यासंदर्भात मार्गदर्शन करतील. या महोत्सवात यवतमाळ,वर्धा,पुणे,जळगाव,चंद्रपूर,वाशिम येथील शेतकरी हजेरी लावणार आहेत.