Breaking News Uncategorized ई-पेपर चंद्रपुर ताज्या बातम्या राष्ट्रीय विदर्भ

चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डीने रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन…!

चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डीने रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन…!

चंद्रपुर – येथील शासकीय रुग्णालय. जिथे नेहमी रुग्णांना रक्तसाठी पायपीठ करावी लागते. वणी, गडचिरोली, आंध्रा येथून रुग्ण सतत येत असतात. कुणाला रक्त भेटते,तर कुणाला रक्तासाठी जीवाचे रान करावे लागते. रक्ताअभावी कित्येक जिव गेल्याचे हे रुग्णालय साक्ष्य आहे. रक्तसाठी वाटेल ते करण्याची तयारी करुण सुद्धा रुग्नाच्या नातेवाईकांना वनवन भटकावे लागते.

अशीच घटना काल दिनांक १५/०९/१८ ठीक रात्री १२.०० ला घडली. शबाना सय्यद नामक स्त्री. गर्भवती असल्याने तिच्या शस्त्रक्रियेसाठी A- रक्तगट ची आवश्यकता होती. हा दुर्मिळ रक्तगट असल्याने मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले.अशावेळी रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशनशी संपर्क झाला.तत्काळ सोशल मीडिया वर् पोस्ट झळकली. इतक्यात चंद्रपुरचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा फोन संस्थेला आला. A- रक्तगट असल्याने त्यांनी तयारी दर्शवली. इथेच मानुसकिचा जिवंत झरा अनुभवायला मिळाला. या वेळी क्षणाचाही विलंब न करता रक्ताचे महत्त्व ओळखून अधीक्षक रेड्डी यांनी रात्री १२ वाजता शासकीय रुग्णालय गाठले.व् मोठ्या उत्साहाने रक्तदान करुण आज २१ व्या शतकात मानवाच्या हृदयात माणुसकी आजही जीवंत आहे. हे दाखवून दिले.
चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी या घटनेव्दारे अखिल मानव जातीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. डॉ. रेड्डीसारखे अधिकारी जर रक्तदान कार्यात हिरहिरिणे सहभाग नोंदविला तर आज एकही असा रुग्ण आढळणार नाही ,ज्याला रक्ताअभावी प्राण गमवावे लागेल.

आजचा दिवस म्हणजे रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशनचा सुवर्ण अक्षरात नोंद व्हावी असा दिवस अनुभवाला मिळाला. लोक म्हणतात की,देव जगात नाही पण आज आम्हाला अधीक्षक साहेब हे परमेश्वरासारखे येऊन जे रक्तदान केले त्यांच्या उत्कृष्ट या कार्यासाठी आम्ही त्यांचे किती आभार मानावे तरी कमी आहे. असे जीवंत उदाहरण अधीक्षक डॉ.रेड्डी साहेबांच्या रुपात आज बघायला मिळाले. असे गौरवोद्गार रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशने काढले.