Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र विदर्भ

नगरसेवक पप्पु पठाण वर चाकुहल्ला

दोघांना अटक ,२ आरोपि फरार {

नगरसेवकाची प्रक्रूती स्थिर

रिपोर्टर :- आशिष गवई

परतवाडा :– अचलपुरातील ठीकरीपुरा येथे आज बुधवार दि. ११ ला सकाळी १० दरम्य़ान नगरसेवक पप्पु पठाण यांचेवर चाकुहल्ला झाला आहे. झालेल्या हल्याने अचलपुरात तनावसद्रुष परीस्थीती निरमाण झाली होती .

अचलपूर शहराला पुन्हा आज एकदा गालबोट लागले आहे परंतु पोलिसांच्या दक्षतेमुळे शहरात परिस्थिती शांत झाली आहे. आज सकाळी दहा च्या सुमारास सफाई कामगार केसरी हिरू 35 व त्याचा साथीदार शुभम कुंडाभोर 25 रा दोघेही ठिकरीपुरा यांनी अचलपूर नगरपालिकेचा नगरसेवक पप्पू पठाण याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडलाने काहीकाळा पुरति शहरात तनावाची होती .सकाळी दहाच्या सुमारास ठिकारीपुरा येथे साफसपाईची पाहणी करण्यासाठी नगरसेवक त्याठिकाणी गेला असता सफाई कामगार व नगरसेवक यांच्यात कामावरून वादविवाद झाला तो वाद इतका वाढला की सफाई कामगार व त्याचा साथीदार या दोघांनी मिळून नगरसेवकाला चाकूने पोटावर वार करत जखमी केले त्या सफाई कामगारासोबत आणखी दोन व्यक्ती भरत मोलू व श्याम मोलू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मात्र पोलिस येण्याअगोदरच ते दोघेही फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले . अचलपुर पोलिसांनी नगर सेवक पप्पू पठाण यांचा भाऊ साजीदखा समशेरखा रा बियाबानी यांच्या तक्रारीवरून शुभम कुंडाभोर आणि केसरी हिरू या दोघांना अटक केली आहे .तर नगरसेवक पप्पू पठाण याला उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अमरावतीला रेफर करनात आले आहे .या प्रकरणी अचलपूर पोलिसांनी भादवी 307,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

**नगरसेवकावर गुन्हा दाखल होणार
सफाई कामगाराने नगरसेवक पप्पू पठाणवर हल्ला केला परंतु नगरसेवकाने सुद्धा सफाईकामगाराला मारहाण तथा दुचाकी वाहनांची तोडफोड केली असल्याची माहिती सफाई कामगाराने दिली त्यामुळे सफाई कामगारांचे बयाण व मेडिकल रिपोर्ट यावरून नगरसेवकाविरोधात गुन्हे दाखल होणार असलेचि माहीती पोलिसांनी दीली.

**अचलपूर शहरातील नागरिकांनी शांतता बाळगावी

कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये .पोलीस विभागाकडून बदमाश गुंडप्रुत्तीच्या लोकांना सोडणार नसल्याचे व नागरीकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आव्हान अचलपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार आधारसिह सोनोने यांनी केले आहे.

**विविध प्रकरणात सात गुन्हे .

या पूर्वी अचलपूरात घडलेल्या अमित बटाऊवाल्या हत्याकांडात सुद्धा नगरसेवकांवर विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.