Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र वर्धा वाशिम विदर्भ

अखेर धारवाडा – अंजनसिंगी बस धावली

अखेर धारवाडा – अंजनसिंगी बस धावली

1 जुलै ला बस सुरु न झाल्यास रविंद्र सोळंके यांनी दिला होता तीव्र आंदोलनाचा इशारा

तिवसा :- रविंद्र सोळंके यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बस चालू झाली – ज्ञानेश्वर सोटे पोलिस पाटील धारवाडा
तिवसा विधानसभा मतदारसंघातील धरणग्रस्त असलेले गाव धारवाडा ज्या लोकांनी व विद्यार्थींनी कधीच बस गावामधे पाहिली नाही. आज गावामधे बस आल्यामुळे गावातील नागरीक व विद्यार्थी खुप आनंदीत झाले गावकर्‍यांनी गाडीची पुजा करुन गाडी चालक व कनडक्टर यांची हार घालून पुजन केले व साईबाबा विद्यालयातील शिक्षक रविंद्र सोळंके व त्यांचा सर्व सहकार्याचे आभार मानले या प्रसंगी गावातील नागरीक ज्ञानेश्वर सोटे, शरद नागपुरे, सचिन सोटे, उमेश ठाकरे दुर्गवाडा, विलास नान्हे, संदिप काळे, ओकांर महिंगे, सदाशिव मेश्राम , शरद नान्हे, हनुमंत मेश्राम, गुणवंत मेश्राम, राजेंद्र बनसोड, रामदास काळे, शामराव सोटे, गजानन सहारे, नितीन सोटे, विजय भुरे, मनोहर इंदोरे, लक्ष्मण भुरे, लक्ष्मण नान्हे, वंदना मेश्राम, राजेंद्र सोटे, रंजीत मारबदे, हिंमत इंदोरे, संदिप इंदोरे, अनिक बनसोड, राजकुमार भुरे विद्यार्थी – विद्यार्थींनी व श्री साईबाबा विद्यालय अंजनसिंगी येथील मुख्याध्यापक सुभाष पुसदकर, रविंद्र सोळंके, प्रकाश दातार, प्रकाश कचरे, निलेश मातकर ,लक्ष्मण ठाकरे, गोवर्धन मुंदाने, प्रदीप पाटील, विलास बनसोड, सचिन पडोळे, श्रीकृष्ण नवले, अंबादास भालेराव, पुरुषोत्तम खैरकर, बाळू लांडे, बाबू भातकुले, नरेश सदाफळे इत्यादी उपस्थित होते…

बस चालू करण्याचे श्रेय आमदार यशोमती ठाकुर व जिप अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे

– रविंद्र सोळंके

धारवाडा गावातील नागरीक जेव्हा बस विषयी समस्या माझ्या कडे घेऊन आले तेव्हा मी स्वतहा प्रथम अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे व तिवसा विधानसभा संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या कडे समस्या मांडली असता मला बस चालू करुन देतो असे दोघांनीही आश्वासन दिले व त्या गोष्टीचा सतत पाठपुरावा करत गेलो शेवटी दि 2/7/2018 ला बस सुरु झाली यांचे पुर्ण श्रेय आमदार यशोमती ठाकूर व जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे आहे