Breaking News अकोला अमरावती ई-पेपर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर ताज्या बातम्या नागपुर बुलढाणा भंडारा मनोरंजन महाराष्ट्र यवतमाळ राष्ट्रीय वर्धा वाशिम विदर्भ

पंचायत समिती सभापतींनी हाती घेतला शिक्षणाचा कासरा

पंचायत समिती सभापतींनी हाती घेतला शिक्षणाचा कासरा

नवागत विद्यार्थ्याचे केले पाद्य पूजन

—————————————-

छगन जाधव

धामणगाव रेल्वे:-
नवीन शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रारंभ प्रसंगी तालुक्यातील तरोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी येथील विद्यार्थ्याची बैलगाडी वरून मिरवणूक काढण्यात आली.या बैलगाडीचा शिक्षणरुपी कासरा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांनी धरला होता.नवागत विद्यार्थ्याचे पाद्यपूजन करून रोप देऊन स्वागत करण्यात आले.या अभिनव उपक्रमाचे कौतुक होत आहे.
नवीन शैक्षणिक सत्राच्या प्रवेशोत्सोवाचा उदंड उत्साह, चिमुकल्या विद्यार्थ्याची हजेरी
गुढ्या, तोरण, रांगोळी, सजावट अशा आनंदी,उल्हासी वातावरणात नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली.तालुक्यातील तरोडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्याची बैलगाडी वरून मिरवणूक काढण्यात आली.या बैलगाडीचा शिक्षण रुपी कासरा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांनी धरला.गावामध्ये प्रवेश दिंडी काढण्यात आली.नवागत विद्यार्थ्याचे पाद्यपूजन करण्यात आले.औक्षण करून रोप देण्यात आले.मोफत पाठयापुस्तकाचे वितरण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ग्रामपंचायतच्या उपसरपंच वृषाली इंगोले,शिक्षण विस्तार अधिकारी वनमाला अघडते,साधन व्यक्ती धिरज जवळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन शेलोकर,उपाध्याक्ष रमा काळपांडे,सदस्य गजानन वाघाडे, राजेंद्र गजभिये,अनीता इंगोले,सुवर्णा शेलोकर,राजेश काळपांडे,दिनेश जगताप,विनोद शेंद्रे, रामबत्ती धुर्वे,वैशाली जगताप,ग्रामपंचायत सदस्य गोपाल शेलोकर,स्वाती बोदिले, प्रतिभा काळपांडे ,बेबी वाघाडे,यांच्यासह पालक, ग्रामस्थ व आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक शकील अहमद यांनी केले.प्रास्तविक शिक्षक पवन बोके यांनी केले तर आभार संगीता ठाकरे यांनी मानले.राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.पंचायत समितीचे गटविकास अधीकारी पंकज भोयर, गटशिक्षणाधिकारी सुषमा मेटकर,विस्तार अधिकारी वनमाला अघडते ,गटसमन्वयक गौतम गजभिये,केंद्रप्रमुख प्रफुल्ल महल्ले व आदींच्या मार्गरदर्शनात प्रवेशोत्सव हा कार्यक्रम घेण्यात आला.

—————————————-
सभापतीनी दिल्या शुभेच्छा

पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांनी बाळगोपाळांचे संस्कार दूत असणा-या अर्थात ज्ञानेपासक ,गुरुजन यांना तसेच विदयार्थ्यांना याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
—————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

15 − six =