Uncategorized अमरावती क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र

युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण

आशिष गवई प्रतिनिधी विदर्भ 24तास

युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण

★2 आरोपी अटकेत
★शेकापूर जवर्डी येथील घटना
अचलपूर प्रतिनिधी :- अचलपूर शहरा जवळ असलेल्या जवर्डी शेकापूर या गावी गुरुवारी सकाळी एक अंगाला शहारे येणारी घटना घडली असून येथील एका कुटुंबा ने गावातील एका युवकाला निर्दयपणे झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची एक अमानुष घटना घडली आहे या घटने मध्ये गंभीर जखमी युवकाला उपचारासाठी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सदरहू घटनेमुळे गावकऱ्यांन मध्ये अत्यंत रोषाचे वातावरण पसरले असून या प्रकरणी परतवाडा पोलिसांनी 2 आरोपींना तात्काळ अटक केली आहे
या घटनेत गंभीर जखमी युवकाचे नाव मंगेश काळे 35 रा जवर्डी असून त्याची पत्नी सौ सविता मंगेश काळे 25 रा जवर्डी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार मुन्ना गाठे 50 रा शेकापूर याचे शेत मंगेश काळे याने मागच्या वर्षी लागवडी ने केले होते त्यात पैश्यामुळे वाद झाला होता त्यावेळी परतवाडा पोलिसांनी ते प्रकरण सामंजस्याने मिटविले होते परंतु गुरुवारी सकाळी मंगेश हा गाडी ने शेतात पाणी ओलिता साठी जात असताना आरोपी मुन्ना गाठे,रघुनाथ गाठे,विष्णू गाठे,मनोज गाठे देवानंद गाठे,मुकेश गाठे,राजेश गाठे हे एकाच कुटुंबातील भावांनी व पुतण्यानी संगनमत करून शेतात जाणाऱ्या मंगेश ला थांबविले व त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली या मारहाणीत मंगेश गंभीर जखमी झाला तेव्हा गावातील पोलीस पाटील यांनी या प्रकरणाची माहीती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी येऊन त्या झाडाला बांधलेल्या युवकाची सुटका केली त्याला त्वरित पुढील उपचारासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले
अशी तक्रार मंगेशच्या पत्नी सविता काळे ने परतवाडा पोलिसात दाखल केली आहे तिच्या तक्रावरून परतवाडा पोलिसांनी अप क्र.125/18 वर कलम 143,147,149,323,342,504,506 भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून या घटनेतील आरोपी मुन्ना गाठे,मनोज गाठे,या दोन आरोपींना त्वरित अटक केली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू असून परतवाडा ठाणेदार सोळंके च्या मार्गदर्शनात पो हे का प्रभाकर खांडेकर,सह पोहेका चव्हाण पुढील तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.

1 + 16 =