Breaking News अमरावती क्राईम महाराष्ट्र

*अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी विवेक कलोती,मिरकणुकीत उथळल्या नोटा

*अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी विवेक कलोती,मिरकणुकीत उथळल्या नोटा*

सत्तेची चाबी समजल्या जाणाऱ्या अमरावती महापालिकेच्या सभापती पदी भाजपचे विवेक कलोती यांची अविरोध निवड झाली आहे,मात्र काढलेल्या मिरवणुकीत भाजप कार्यकर्त्यानी चक्क नोटा उधळल्याने शहरात चर्चेला उधाण आले, तुषार भारतीय यांचा कार्यकाळ संपल्याने आज सभापती पदाची निवडणूक महापालिकेच्या सभागृहात पार पडली,परंतु विवेक कलोती यांच्या व

िरोधात कुणीही अर्ज न टाकल्याने विवेक कलोती यांची स्थायी समिती सभापती अविरोध निवड झाली,
निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यानी कलोती यांची विजयी मिरवणूक काढली यात भाजप कार्यकर्त्यांनी चक्क नोटा उधळल्या.

विवेक कलोती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे मामेभाऊ आहेत, कलोती यांची निवड होणार ही अनेेक दिवसांपासून चर्चा होती,ती आज खरी ठरली,मात्र नोटा उधळल्याने चर्चेला उधाण आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

five × 4 =