अमरावती क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र

अमरावती च्या धामणगावात दोन कोटींची रेती जप्त, ९२ ट्रक पकडले, राज्यात सर्वात मोठी कारवाई

अमरावती च्या धामणगावात दोन कोटींची रेती जप्त, ९२ ट्रक पकडले, राज्यात सर्वात मोठी कारवाई

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे सूर्योदयापूर्वी रेती उत्खननास परवानगी नसताना रेती वाहून नेणारे तब्बल ९२ ट्रक आज पहाटे ५ वाजता पकडून पोलीस अधीक्षकांनी दोन कोटींची रेती जप्त केली. दरम्यान, उशिरा रात्रीपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती. वर्धा व अमरावती जिल्ह्याची सीमा निश्चित करणाºया धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या बोरगाव धांदे परिसरात रेतीघाट क्रमांक २६९ येथून अवैध रेती उत्खनन व साठवणूक केलेली रेती मध्यरात्री तसेच पहाटे नेली जात असल्याची माहिती अमरावती जिल्हा पोलिसांना मिळाली. दरम्यान, पहाटे पाच वाजता त्यांनी आपल्या विशेष पथकासह या रेती उत्खननावर कारवाई केली़ अमरावती, कारंजा व अकोला जिल्ह्यात जाणारे ९२ ट्रक त्यांनी पकडले़ ताब्यात घेतलेल्या ट्रकची तब्बल पुलगाव ते देवगाव रस्त्यावर अडीच किलोमीटरपर्यंत रांग होती. विशेषत: तीन पोकलॅन, दोन डोंगीही जप्त केल्या. सदर कारवाईनंतर तब्बल ९२ ट्रक तळेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले़ पोलीस प्रशासनाची सर्वांत मोठी रेती तस्करीविरुद्ध केलेली ही पहिली कारवाई आहे़

Leave a Reply

Your email address will not be published.

thirteen + 9 =