अमरावती ई-पेपर क्राईम महाराष्ट्र विदर्भ

वाघाची शिकार करून कातडी विकणारा वनविभाग व वाईल्ड लाईफ क्राईम सेल च्या जाळ्यात

दि -६ अमरावती —————————————————————————————————————————————————————————————-
वाघाची शिकार व त्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच मेळघाट वनविभागाच्या कर्मचा-यांनी सापळा रुचून एकास अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी पसार झाला. ही कारवाई मेळघाट वनविभाग व वाईल्ड लाईफ क्राईम सेल यांच्या संयुक्त पथकाने केली. सुखदेव धोटे (५३, रा. गेईबारसा मध्यप्रदेश) असे कातड्यासह अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वाघाच्या कातडीची विक्री होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाला होती, त्याआधारे बनावट ग्राहक बनून मध्यप्रदेशातील तस्कराकडून रविवारी रात्री १० वाजता वाघ आणि बिबटचे कातडे आरोपी सुखदेव धोटे यांनी एका साथीदारासह मोटरसायकलवरून पोत्यात भरून आणले होते. वनाधिकारी कर्मचा-यांना वरुड-प्रभातपट्टण मार्गावर त्याच्याशी सौदा करीत त्याला अटक केली. दरम्यान त्याचा सहकारी पळून गेला. तस्कराची मोटरसायकल जप्त करण्यात आली.


ही कारवाई मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनात उपवनसंरक्षक विशाल माळी, आकाश सारडा, जीवन दहिकार, अनिल  चिमोटे, संदीप खंडारे, हरीश दामोदरे, प्रभाकर कोकाटे,सिपना वन्यजीव विभागाचे वनपाल आशिष चक्रवर्ती जारीदा रेंज, उल्हास भोंडे व राजेश धुमाळे यांनी केली. पुढील तपास अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मीना यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक भोंडे, वरूडचे वनपरिक्षेत्र अधिकारी काळे, गायधने करीत आहे.
मध्यप्रदेशात केली शिकार
तस्करांनी मध्यप्रदेशच्या चितलपाठा मुलताई जंगल परिसरात या दोन्ही शिकारी केल्याची माहिती त्यांनी वनाधिका-यांना प्राथमिक चौकशीअंती दिली. हे कातडे शावकाचे, तर पाच वर्षांच्या बिबटाचे असावे असा अंदाज लावण्यात येत आहे.
वाघाच्या कातड्याची तस्करी करणारा एक आरोपी पसार असून त्याचा आम्ही शोध घेत आहोत. जंगलात आणखी शिकारी सक्रिय आहेत का? याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करू असल्याचे मत  उपवनसवरक्षक विशाल माळी यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × two =