अकोला ताज्या बातम्या महाराष्ट्र

चला युवा सेना मजबुत करू :विठ्ठल सरप पाटील

युवासेना मजबूत करण्यासाठी लवकरच नियुक्त्या : युवासेना जिल्हाप्रमुख विट्ठल सरप पाटिल
अकोला जिल्हा युवासेना तर्फे संपूर्ण जिल्ह्यातील युवासैनिकांना शिवसेना – युवासेना मजबूत करण्यासाठी युवासेनेच्या उद्दिष्टपूर्तीचे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुस्तानातील प्रत्येक माणसांचे हित जोपासण्यासाठी,प्रत्येक महाराष्ट्रतील सर्व सामान्य माणसाचा, युवकचा आवाज एकदिलाने उंचावण्यासाठी तसेच गोरगरीब जनतेच्या,शेतकऱ्याच्या हक्कासाठी
शिवसेनेची स्थापना झाली.त्यानंतर हिंदुस्तानातील तरुणाला आपल्या हक्काचे व्यासपीठ १७ ऑक्टोबर २०१० ला युवासेनेच्या स्थापनेनंतर मिळाले. युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, यांच्या नेतृत्वात अखंड महाराष्ट्रभर युवासेना ही आज ताकतीने उभी आहे. युवासेनेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला आपला विचार व्यक्त करण्यासाठी तसेच आपला हक्क मिळवण्यासाठी लढण्याची हिम्मत मिळाली आहे. तरुणांना संघटित होऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची तसेच सर्वसामान्य तरुणांना नेतृत्व करायची संधी मिळाली आहे. अकोला जिल्हा हा शिवसेनेचा गढ आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे व संपर्क प्रमुख मा वरुण जी सरदेसाई यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यातील युवासेना मुख्य पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या केल्या आहेत.त्यामुळे आता शिवसेनेला मजबूत करण्यासाठी आपल्याला युवासेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हात जलदगतीने काम करायचे आहे. व येणाऱ्या २०१९ च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्हात भगवा फडकवायचा आहे, यासाठी अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी – प्रत्येक नगरात तसेच तालुक्यात – गाव तेथे शाखा सुरू करण्यासाठी आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे.ज्यामुळं प्रत्येक घरातील १ तरुण हा आपल्या संघटनेशी जुळला असावा ज्यामुळे त्या परिसरातील संघटन मजबूत होईल. येणाऱ्या काही दिवसांमध्ये खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करायच्या आहेत.
आपल्या जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघातील तालुका प्रमुख,तालुका
संघटक,उपतालुका प्रमुख,उपतालुका संघटक,शहर प्रमुख,उपशहर संघटक,जिल्हा परिषद सर्कल प्रमुख,पंचायत समिती सर्कल प्रमुख तसेच उपसर्कल प्रमुख उपसंघटक याप्रमाणे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशने व शिवसेना नेते मा.दिवाकरजी रावते साहेब, अकोला जिल्हा संपर्क प्रमुख मा.खा.अरविंदजी सावंत साहेब,
मा.आ.गोपीकीशनजी बाजोरीया साहेब,सहाय्यक संपर्क प्रमुख मा. श्रीरंगदादा पिंजरकर,
जिल्हाप्रमुख नितिनजी देशमुख. संपर्क प्रमुख वरुण जी सरदेसाई साहेब यांच्या आदेशाने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करायच्या आहेत. या पदांच्या माध्यमातून शिवसेना युवासेना मजबूत करण्यासाठी,प्रत्येक घरात शिवसेना युवासेना पोहचवण्याची जबाबदारी घेणारे,तसेच युवासेनेच्या प्रचार प्रसारासाठी,उद्दिष्टपूर्तीसाठी जे युवासैनिक मनापासून इच्छुक असतील त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघातील युवासेना उपजिल्हाप्रमुखांशी संपर्क करावा व युवासेनेच्या ऐच्छिक पदासाठी आपला अर्ज सादर करावा.त्यामधून मुलाखतीच्या माध्यमातून आपली गुणवत्ता तपासून तसेच वरिष्ठांशी चर्चा करून आपली नियुक्ती केली जाईल.तरी मी युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील अकोला जिल्हातील संपूर्ण युवासैनिकांना आवाहन करतो की आपण सर्वांमिळून जिल्ह्यात युवासेनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शिवसेना मजबुत करण्यासाठी कार्य करू आणि येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत भगवा फडकवू इच्छुक युवासैनिकांसाठी – आपण ज्या विधानसभा मतदारसंघात राहता ज्या परिसरात आपल्याला युवासेनेचे काम करायचे आहे त्यांनी उपजिल्हाप्रमुखांशी राहुल रामभाऊ कराळे अकोट,दीपक बोचरे बाळापुर,सोनू वाटमारे मुर्तिजापुर, योगेश बुंदेले अकोला पच्छिम,राहुल सुरेश कराळे अकोला पूर्व ,राजेश पाटील,नितिन मिश्रा अकोला शहर कुणाल पिंजरकर तसेच आपली माहिती
akolayuvasena@gmail. com यावर मेल करावी.
– आपला विनीत –
विठ्ठल सरप पाटील

One Reply to “चला युवा सेना मजबुत करू :विठ्ठल सरप पाटील

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen − 11 =